जिंतूर येथे खाजगी उर्दू शाळेची भिंत पडून ७ विद्यार्थि जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 06:13 PM2018-08-27T18:13:29+5:302018-08-27T18:15:58+5:30
शहरातील उस्मानपुरा भागातील एका उर्दू शाळेची भिंत आज दुपारी १. ३० वाजेच्या सुमारास कोसळली.
जिंतूर (परभणी ) : शहरातील उस्मानपुरा भागातील एका उर्दू शाळेची भिंत आज दुपारी १. ३० वाजेच्या सुमारास कोसळली. यात चौथी वर्गातील ७ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. भिंत बाहेरील बाजूस कोसळल्याने सुदैवाने मोठी प्राणहानी टळली.
या बाबत अधिक माहिती अशी की, उस्मानपुरा भागात एक खाजगी उर्दू शाळा आहे. येथे पहिली ते सातवी वर्गापर्यंत या शाळेत जवळपास एकूण ३२४ विद्यार्थी आहे. आज नेहमीप्रमाणे शाळा सुरु झाली असता दुपारी १.३० वाजता ४ थी व ५ वर्गात शिक्षक शिकवीत असताना अचानक या दोन्ही वर्गांची भिंत कोसळली. भिंत बाहेरच्या बाजूने कोसळ्याने जोरदार आवाज होताच परिसरातील नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. यात ७ विद्यार्थी जखमी झाले.