७ हजार १७३ शेतकरी झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:56+5:302021-03-01T04:19:56+5:30

परभणी: जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात ...

7 thousand 173 farmers became arrears free | ७ हजार १७३ शेतकरी झाले थकबाकीमुक्त

७ हजार १७३ शेतकरी झाले थकबाकीमुक्त

Next

परभणी: जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने महाकृषी ऊर्जा अभियान अमलात आणले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ७ हजार १७३ शेतकऱ्यांनी ३ कोटी रुपयांचा वीज बिल भरणा करून थकबाकीमुक्त झाले आहेत.

ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना दररोज पैसे द्यावे लागतात. मात्र महावितरणकडून वीज ग्राहकांना पुरवठा करण्यात आलेल्या वीज बिलाचा भरणा वेळेत होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या थकबाकीमुळे चालू देयके व थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली. मात्र या मोहिमेलाही कृषीपंपधारक व वीज ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीसमोर जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांची थकबाकी वसुली कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी राज्य शासन व महावितरण कंपनीच्या समन्वयातून महाकृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वीज ग्राहक व कृषीपंपधारकांनी आपल्याकडे असलेल्या थकबाकीचा भरणा केल्यास विलंब आकार व बिलातील व्याजातील सूट देण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत येणाऱ्या ७ हजार १७३ शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत ३ कोटी रुपयांचा थकबाकीचा भरणा केला आहे. त्यामुळे हे शेतकरी आता थकबाकीतून मुक्त झाले आहेत. मात्र या योजनेला घरगुती, वाणिज्य, लघुदाब, औद्योगिक, वीज ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील जवळपास ३०० हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

५९४ कोटी रुपयांची मिळणार माफी

राज्य शासन व महावितरण कंपनीच्या समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ८७० शेतकऱ्यांकडे असलेल्या १,३८६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे भरल्यास कृषीपंपधारकांना विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण ५७४ कोटी ७ लाख रुपयांची माफी मिळणार आहे. त्यामुळे महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत १,३८६ कोटी रुपयांपैकी ९६ हजार ८७० शेतकऱ्यांना केवळ ८११ कोटी ९३ लाख रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.

वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचा सत्कार

गंगाखेड उपविभागांतर्गत येणाऱ्या कृषीपंपधारकांनी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत आपल्या थकबाकीचा भरणा वीज वितरण कंपनीकडे केला आहे. हे शेतकरी महावितरणसाठी तारणहार ठरत असल्यामुळे गंगाखेड येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागात कार्यकारी अभियंत्याच्या उपस्थितीत थकबाकीमुक्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: 7 thousand 173 farmers became arrears free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.