आवई शिवारात जप्त केला ७२ हजारांचा गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:59+5:302021-07-29T04:18:59+5:30
तालुक्यातील आवई शिवारात एका शेतात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती पोेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी पोलीस ...
तालुक्यातील आवई शिवारात एका शेतात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती पोेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे
बुधवारी दुपारी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, उपनिरीक्षक माणिक गुट्टे, महेंद्र पोपलवार, शिवराज लोखंडे यांच्यासह १० ते १५ पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा आवई शिवारात दाखल झाला. शिवारातील गट क्र. ८० मध्ये एका शेतात गांजाचे एक मोठे झाड तर दुसऱ्या शेतात १६९ लहान रोपे आढळले. जप्त केलेल्या गांजाच्या रोपांची किंमत ७२ हजार ३०० रुपये एवढी आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेतमालक भागवत मिनाजी पवार व बाबाराव दगडोजी बुचाले यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात भागवत मिनाजी पवार यास ताब्यात घेतले आहे. कारवाई करणाऱ्या पथकात जमादार अर्जुन रणखांब, मनोज नलगीकर, नागनाथ पोते, मंगेश जुकटे, महंमद जुबेर, दत्ता काकडे, विष्णू भिसे, समीर पठाण, देविका मनवर आदींचा सहभाग होता.