परभणी जिल्ह्यात रबीची ७५ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:46 AM2017-12-25T00:46:04+5:302017-12-25T00:46:13+5:30
यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच १६१ टक्के क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच १६१ टक्के क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला जुलै आणि आॅगस्ट महिन्यामध्ये पावसाने जिल्ह्यामध्ये उघडीप दिली होती. त्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके शेतकºयांची हातची गेली होती. मात्र जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने विहीर, नदी, नाले आणि बोअरला मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले.
१८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये २ लाख ९५ हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामध्ये ९२ हजार ९७९ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, २६ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावर गहू तसेच ८५ हजार ८१४ हेक्टरवर हरभरा, २ हजार ३५१ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असल्याने यावर्षीच्या रबी हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे.
जायकवाडी, निम्न दुधनाचा शेतकºयांना झाला फायदा
४जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबरपर्यंत २ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पेरणीपूर्ण झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने जायकवाडी धरणे १०० टक्के तर निम्न दुधना प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे या पाण्याचा रब्बी हंगामात वापर होऊ शकतो, या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली आहे. जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे एकदा तसेच निम्न दुधना प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे आणि दुधना नदीच्या पात्रातून असे दोनदा पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा उत्पन्न वाढीसाठी शेतकºयांना मोठा फायदा होणार आहे.