जलसंपदा विभागात ७५ टक्के पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:21 AM2021-09-22T04:21:23+5:302021-09-22T04:21:23+5:30
यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात असून तेथील ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. ...
यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात असून तेथील ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. यात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ परभणी, माजलगाव कालवा विभाग क्र. ७ व १० परभणी, गंगाखेड, परळी वै., तसेच निम्न दुधना प्रकल्प विभाग सेलू, लघु पाटबंधारे विभाग परभणी येथील कार्यलयातील पदांचा समावेश आहे. जिल्ह्यात जायकवाडी, निम्न दुधना प्रकल्प, येलदरी, करपरा, मासोळी व लघु प्रकल्प तसेच गोदा नदीवरील लोणी, ढालेगाव, मुदगल, खडका, मुळी व डिग्रस बंधाऱ्यांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढली आहे; परंतु येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची १ ते वर्ग ४ पर्यंत जवळपास २००० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा शेतकऱ्यांना म्हणावा तसा लाभ होत नाही. त्यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.