पाथरी येथे अन्न व औषध प्रशाशनाच्या धाडीत ८ लाखाचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 05:43 PM2017-12-13T17:43:50+5:302017-12-13T17:49:11+5:30
पाथरी शहरात तीन ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेग वेगळ्या पथकाने 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता धाडी टाकून 7 लाख 90 हजार रुपयांचा अवैध गुटखा पकडून मोठी कारवाई केली. गेल्या अनेक महिन्यापासून खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर प्रथमच धाड पडल्याने आता हा गोरख धंदा बंद होईल का अशी चर्चा शहरात होती.
पाथरी (परभणी ) : पाथरी शहरात तीन ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेग वेगळ्या पथकाने 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता धाडी टाकून 7 लाख 90 हजार रुपयांचा अवैध गुटखा पकडून मोठी कारवाई केली. गेल्या अनेक महिन्यापासून खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर प्रथमच धाड पडल्याने आता हा गोरख धंदा बंद होईल का अशी चर्चा शहरात होती.
शहरातील एकतानगरमधील यासीन अन्सारी अब्दुल हक, माजलगावरोड लगत असलेल्या होंडा एजन्सीच्या पाठीमागील शेख सरफराज शेख जिलानी व अशफाख अब्दुल करीम अन्सारी या तीन अवैध गुटखा विक्रेत्यांवर परभणीचे अन्न व औषध प्रशाशनाचे सहाय्यक आयुक्त के.आर.जयपुरकर, यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. या पथकात राम मुंडे,फरीद सिद्दीकी, संजय चट्टे, निखिल कुलकर्णी, वर्षा रोडे, प्रज्ञा सुरशे, उमेश कावळे, सुनिल जिंतुरकर, प्रकाश कच्छवे, राधा भोसले, नमुना सहाय्यक प्रमोद शुक्ला, बालाजी सोनटक्के यांचा समावेश होता.
यात विविध कंपन्याची तंबाखु मिश्रीत सुगंधी सुपारी, पानमसाला आदी 7 लाख 90 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यांवर 2006 च्या अन्न सुरक्षा व भेसळ कायदया प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त के.आर.जयपुरकर यांनी दिली.