१५ दिवसांत ८ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 AM2021-02-20T04:48:48+5:302021-02-20T04:48:48+5:30

वीज वितरण कंपनीच्या वतीने घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्य व आदी वर्गवारीतील वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. या वीज ...

8 lakhs recovered in 15 days | १५ दिवसांत ८ लाखांची वसुली

१५ दिवसांत ८ लाखांची वसुली

Next

वीज वितरण कंपनीच्या वतीने घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्य व आदी वर्गवारीतील वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. या वीज पुरवठ्यापोटी देण्यात येणारे ग्राहकांना वीज बिल थकित आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला वीज समस्यांचे निवारण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.बोरी येथील २ हजार ५२०वीज ग्राहकांकडे २कोटी२० लाख ५ हजार २३०रुपयांची थकबाकी आहे.. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज बिल वसुली सुरु केली आहे. या वसुलीअंतर्गत १५ दिवसांत ८ लाख रुपयांची वसुली वीज ग्राहकांकडून करण्यात आली आहे.

‘‘ वीज ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल. त्यामुळे बोरी येथील वीज बिल भरणा केंद्रात आपल्या बिलाचा भरणा करावा.

एस.डी. जाधव, अभियंता

Web Title: 8 lakhs recovered in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.