पूर्णा येथे तहसीलदारांच्या छाप्यात ८० ब्रास अवैध वाळू साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:56 PM2018-06-20T16:56:11+5:302018-06-20T16:56:11+5:30
कानडखेड शिवारातील गायरान जमिनीवर असलेल्या अवैध वाळूसाठ्यावर तहसीलदार श्याम मंडनूरकर यांनी छापा टाकला. यात सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 80 ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
Next
पूर्णा (परभणी) : कानडखेड शिवारातील गायरान जमिनीवर असलेल्या अवैध वाळूसाठ्यावर तहसीलदार श्याम मंडनूरकर यांनी छापा टाकला. यात सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 80 ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
पूर्णा नदीपात्रा नजीक असलेल्या कानडखेड शिवारात शासकीय गायरान आहे. यावर अज्ञात व्यक्तींनी अवैध रित्या वाळूचा साठा केला आहे.याची माहिती तहसीलदार श्याम मंडनूरकर यांना मिळाली. यावरून आज सकाळी ११ वाजता तहसीलदार मंडनूरकर यांनी तलाठी, कोतवाल व इतर सहकाऱ्यांसह या परिसरात छापा टाकला. यावेळी तेथे 80 ब्रास वाळू अवैधरित्या साठवलेली आढळली. हा साठा जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.