परभणी जिल्हाभरात ८१ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:47 AM2018-01-06T00:47:00+5:302018-01-06T00:47:04+5:30
जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी २ जानेवारीपर्यंत २ लाख २५ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी २ जानेवारीपर्यंत २ लाख २५ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामाच्या शेवटी परतीच्या पावसाने जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी शेतकºयांनी केली आहे. यामध्ये गव्हासाठी ३० हजार ४७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. मात्र ३१ हजार २२३ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. हरभºयासाठी ५३ हजार ६४ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते; परंतु, तब्बल ९४ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे. ज्वारीसाठी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्रापैकी ९६ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.
करडईसाठी कृषी विभागाने २५ हजार २०९ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. केवळ २ हजार ३५१ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली आहे. एकंदरीत रब्बी हंगामात २ जानेवारी पर्यंत जिल्ह्यात ८१.२४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत १०० टक्के पेरणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.