जिल्ह्यात ८४ रुग्ण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:58+5:302021-03-07T04:16:58+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, शनिवारी दिवसभरात ८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ...

84 patients in the district; Death of one | जिल्ह्यात ८४ रुग्ण; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात ८४ रुग्ण; एकाचा मृत्यू

Next

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, शनिवारी दिवसभरात ८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची काळजी वाढली आहे.

मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असल्या, तरी रुग्णसंख्या घटत नसल्याचे दिसत आहे. शनिवारी आरोग्य विभागाला एकूण एक हजार ४९३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या एक हजार ३८१ अहवालांत ७१ आणि रॅपिड टेस्टच्या ११२ अहवालांत १३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. येथील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण आठ हजार ८४० रुग्णसंख्या झाली असून, त्यापैकी आठ हजार ३९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३३१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, ११७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये २१, खाजगी रुग्णालयात ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ३१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

या भागात आढळले रुग्ण

परभणी शहरातील वांगी रोड, गांधी पार्क, रामकृष्णनगर (४), नवजीवन कॉलनी, अक्षता मंगल कार्यालयाजवळ, यशवंतनगर, गजानननगर, आरोग्य कॉलनी (२), कोमटी गल्ली, यशवंतनगर, माऊलीनगर, नाथनगर (२), शास्त्रीनगर, अंबिकानगर (४), जिंतूर रोड, देशमुख हॉटेल परिसर, भजनगल्ली, कडबी मंडई, साखरे कॉलनी, आनंदनगर, विवेकानंदनगर तसेच गंगाखेड शहरातील डॉक्टर लेन (४), जिंतूर (२), सोनपेठ, मानवत, गणेशनगर, सेलू या भागात रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: 84 patients in the district; Death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.