८४२ रुग्णांची भर; १३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:31+5:302021-04-10T04:17:31+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असून, शुक्रवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने धास्ती ...

842 patients added; 13 killed | ८४२ रुग्णांची भर; १३ जणांचा मृत्यू

८४२ रुग्णांची भर; १३ जणांचा मृत्यू

Next

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असून, शुक्रवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने धास्ती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे ८४२ नवीन रुग्णांचीही एका दिवसात नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील पकोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य यंत्रणा रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असून, कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत; परंतु अजूनही रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. शुक्रवारी जिल्ह्याला ३ हजार ७४ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या २ हजार २७३ अहवालांमध्ये ५४८ आणि रॅपिड टेस्टच्या ८०१ अहवालांमध्ये २९४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमुळेही मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. शुक्रवारी शासकीय रुग्णालयातील ९ आणि खासगी रुग्णालयातील ४ अशा १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ९ पुरुष आणि ४ महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १९ हजार ५०१ रुग्णसंख्या झाली असून, त्यापैकी १४ हजार ७८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ४९५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या ४ हजार २२३ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात ६५, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १७४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २१४, अक्षदा मंगल कार्यालय १३१ आणि गृह विलगीकरणात ३ हजार २९९ रुग्ण उपचार घेत आहेत.

३९२ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही आता वाढले आहे. काही दिवसांपूर्वी दररोज १०० ते १५० रुग्ण कोरोनामुक्त होत होते. आता ही संख्या ३०० पेक्षा अधिक झाली आहे. शनिवारी ३९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या रुग्णांना प्रशासनाने रुग्णालयातून सुटी दिली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: 842 patients added; 13 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.