लंडनमधून आलेल्या ९ जण २८ दिवसांसाठी क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:14+5:302020-12-30T04:22:14+5:30

विदेशात कोरोनाची दुसरी लाट पसरल्याने सर्वांनाच पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. राज्य शासनाने विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी ...

9 people from London quarantined for 28 days | लंडनमधून आलेल्या ९ जण २८ दिवसांसाठी क्वारंटाईन

लंडनमधून आलेल्या ९ जण २८ दिवसांसाठी क्वारंटाईन

Next

विदेशात कोरोनाची दुसरी लाट पसरल्याने सर्वांनाच पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. राज्य शासनाने विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून, विदेशातून आलेले प्रवासी विमानतळावर उतरल्यानंतर त्या त्या जिल्हा प्रशासनाला या प्रवाशांची माहिती दिली जात आहे. विमानतळ प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात लंडनहून ९ प्रवासी शनिवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आरोग्य विभागाने या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन केले आहे. तसेच त्याच दिवशी आर.टी.पी.सी.आर. चाचणी करण्यात आली. सर्वच प्रवाशांची ही चाचणी निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

परभणी जिल्ह्यात दाखल झालेले विदेशातील सर्व प्रवासी लंडन येथून आल्याची माहिती प्रशासनाने दिली. या सर्व प्रवाशांचा लँडींग होण्याचा दिनांक वेगवेगळा आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशांना २८ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांचा जीव भांड्यात पडला आहे.

आठ महिन्यांत ७१ जण दाखल

७१ नागरिक आठ महिन्यामध्ये विदेशातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मार्च महिन्यात जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार १८ मार्च रोज ४ जण, २० मार्च रोजी ५ जण आणि २१ मे रोजी संकलित केलेल्या अहवालानुसार ६२ नागरिक विदेशातून जिल्ह्यात दाखल झाले. त्यानंतर आता पुन्हा विदेशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने विदेशातून आलेल्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. शनिवारी ९ जण लंडन येथून जिल्ह्यात दाखल झाले.

प्रत्येकाची आरटीपीसीआर होते

विदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन केले जात आहे. या नागरिकांची आर.टी.पी.सी.आर. तपासणी केली जात आहे. ही तपासणी निगेटिव्ह आली तरीही त्यांना २८ दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवण्यात येत असून, या काळात वैद्यकीय अधिकारी नागरिकांच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवून आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पुणे येथील प्रयोगशाळेत स्वॅब नमुन्याची तपासणी होणार आहे.

नागरिक विदेशातून दाखल

जणांचे अहवाल निगेटिव्ह

Web Title: 9 people from London quarantined for 28 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.