९० हजार ४०० मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:45+5:302020-12-28T04:09:45+5:30

तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत असून दोन टप्प्यात या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पाडतात. ६५ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर ...

90,400 voters will exercise their right to vote | ९० हजार ४०० मतदार बजावणार मतदानाचा हक्क

९० हजार ४०० मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Next

तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत असून दोन टप्प्यात या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पाडतात. ६५ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत ५६४ ग्रामपंचायत सदस्य आपले नशीब आजमावणार आहेत. उमेदवारांची संख्या किती असणार आहे.याबाबत अजूनही अनिश्चितता असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी चिन्ह निवडली असून यामध्ये काही नवीन चिन्हाचा समावेश दिसून येत आहे. कॅरम ,बॅट ,विमान,शिलाई मशीन या ओळखीच्या चिन्ह सोबतच आता लुडो गेमचे चिन्ह ही उमेदवारासाठी निवडण्यात आले आहे. पूर्णा तालुक्यात यावेळी ६५ ग्रामपंचायतीसाठी सुमारे ९० हजार ४०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Web Title: 90,400 voters will exercise their right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.