ग्रामीणमध्ये ९४ तर शहरात ९० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:02 AM2021-02-05T06:02:44+5:302021-02-05T06:02:44+5:30

शहरात ग्रामीण रुग्णालयासह एकूण २५ बूथवर पल्स पोलिओ मोहीम राबविली. यामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील ६ हजार ...

94% vaccination in rural areas and 90% in urban areas | ग्रामीणमध्ये ९४ तर शहरात ९० टक्के लसीकरण

ग्रामीणमध्ये ९४ तर शहरात ९० टक्के लसीकरण

Next

शहरात ग्रामीण रुग्णालयासह एकूण २५ बूथवर पल्स पोलिओ मोहीम राबविली. यामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील ६ हजार ९३७ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६ हजार ३०४ बालकांचे लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागात आडगाव - बाजार, आसेगाव, चारठाणा, कौसडी, वझर - हंडी आणि येलदरी या ६ आरोग्य केंद्रांसह त्या अंतर्गतच्या २९५ बूथवर २४ हजार ४३१ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी २३ हजार १६१ बालकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये सर्वच केंद्रांतर्गतचे उद्दिष्ट ९१ ते ९६ टक्क्यापेक्षा अधिक आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख माजीद, डॉ. कैलास पवार, डॉ. वाजेद अली, डॉ. शहाबाज खान, डॉ. अनंत दहिवाल, डॉ. हेमंत भुते, डॉ. जगदीश भालेराव, डॉ. वसंत गरड, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. सागर वाल्हेकर, डॉ. शैलेश राठोड, डॉ. हनिफ खान यांच्यासह आरोग्य सहाय्यक, परिचारिका, परिचारक तसेच आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यासह ६६० आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. सरपंच, स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते गावागावातून बालकांना लस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, उपविभागीय महसूल अधिकारी उमाकांत पारधी यांनी मोहिमेसंदर्भात शहरातील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.

Web Title: 94% vaccination in rural areas and 90% in urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.