शहरातील नागरिकांकडे थकला ९५ कोटींचा कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:18+5:302021-03-18T04:17:18+5:30
शहरात कराच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने महानगरपालिकेसमोर आर्थिक अडचणी उभ्या टाकल्या आहेत. कर वसुलीसाठी मनपा प्रशासन विविध मार्गाने प्रयत्न ...
शहरात कराच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने महानगरपालिकेसमोर आर्थिक अडचणी उभ्या टाकल्या आहेत. कर वसुलीसाठी मनपा प्रशासन विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत कर भरावा यासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरील विलंब आकार शास्तीची रक्कम १०० टक्के माफ करण्यात आली आहे. ही रक्कम जवळपास २७ कोटीपर्यंत आहे. सद्य:स्थितीला एकूण करापैकी मालमत्ता कराची १६ कोटी ५ लाख रुपये आणि पाणीपट्टीची ३ कोटी ७० लाख रुपये वसुली झाली आहे. विशेष म्हणजे मालमत्ता करातील चालू थकबाकी २३ कोटी ५९ लाख रुपये असून, मागील अनेक वर्षांपासूनची थकबाकी त्यापेक्षा दुप्पट म्हणजे ५६ कोटी ८६ लाख रुपये एवढी आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक कराची थकबाकी असलेले १हजार ८२ नागरिक असून, त्यांच्याकडे ३९ कोटी रुपयांचा कर थकला आहे. तर ६ हजार ८४९ मालमत्ताधारक अनिवासी आहेत. त्यांच्याकडे ३७ कोटी ४७ लाख रुपयांचा कर थकीत आहे.
थकबाकीची ही रक्कम वसूल करण्यासाठी पथके स्थापन केली असून, प्रसंगी जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त पवार यांनी दिला आहे.