रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 11:41 AM2024-12-07T11:41:30+5:302024-12-07T11:42:22+5:30
पाथरी ते मानवत रस्त्यावर पोखरणी फाटा येथे झाला अपघात
- विठ्ठल भिसे
पाथरी : पाथरी ते मानवत रस्त्यावर पोखरणी फाटा परिसरात रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकून भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास झाला.
रामेटाकळी येथून एक ट्रॅक्टर दोन ट्रॉलीसह पाथरी येथील साखर कारखान्याला ऊस घालून परत निघाला होता. तर मानवत तालुक्यातील यशवाडी येथून देवदर्शन करून दुचाकीवरील तिघे मालजगावकडे हात होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाथरी ते मानवत रस्त्यावर पोखरणी फाटा परिसरात ट्रॅक्टर दोन्ही ट्रॉलीसह रस्ता ओलांडत होता. यावेळी समोरून येणारी दुचाकी ( क्र एम एच 12 एच एम 2426 ) ट्रॅक्टरच्या पहिल्या ट्रालीवर धडकली. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. माहिती मिळताच अपघातस्थळी पोलिस दाखल झाले आहेत. दोन्ही जखमींना पाथरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.