भर मोंढ्यात बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटले, २० लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 10:10 PM2023-02-04T22:10:21+5:302023-02-04T22:11:14+5:30

पालम शहरातील मोंढ्यात धाडसी दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून सराफा व्यापाऱ्याला सुटले

A jewellery shop was robbed at gunpoint in Mondya at Palam, jewels worth 20 lakhs looted | भर मोंढ्यात बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटले, २० लाखांचे दागिने लंपास

भर मोंढ्यात बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटले, २० लाखांचे दागिने लंपास

googlenewsNext

- भास्कर लांडे

पालम ( परभणी) : ऐन बाजाराच्या दिवशी गजबजलेल्या पालम श मोंढ्यातील सिद्धनाथ ज्वेलर्सवर धाडसी दरोडा पडला. त्यात तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्याचे व चांदीचे मिळून तब्बल २० लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (दि.४) रात्री ८ वाजता घडली.

पालम शहराततील मोंढा भागात सराफा व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यातील सूर्यकांत शिंदे यांच्या सिद्धनाथ ज्वेलर्स या दुकानात ते व मुनीम दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. तितक्यात रात्री ८ वाजता तोंडाला रूमाल बांधून दुचाकीवरून आलेले दोघे दुकानात शिरले. त्यांनी मालक व मुनीमास बंदूक व चाकूचा धाक दाखवून दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने हिसकावून घेण्यास सुरुवात केली. दुकानातील नेकलेस, झुंबर, मनी -मंगळसूत्र, गंठण यासह अन्य सोन्याचे व चांदीचे दागिने बॅगेत भरले. परंतु बंदुकीच्या धाकामुळे दुकान मालक व मुनीमांनी आरडाओरडा केला नाही. तरीही दागिने हिसकावत असतानाचे दृश्य परिसरातील दुकानदार व नागरिकांनी पाहिले.  ते पाहून दुकानाजवळ येऊन सदर चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देखील बंदुकीचा धाक दाखवून सदर चोरटे दूचाकीवरून पसार झाले. तदनंतर घटनेची माहिती मिळताच पालम ठाण्याचे पोनी प्रदीप काकडे, सपोनी मारुती कारवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मोंढ्यात मोठी गर्दी जमली होती.

चोरांचे मनोबल वाढले
पालम तालुक्यातील खरब धानोरा येथील चोरीची घटना ताजी असतानाच शनिवारी चोरट्यांनी पालम शहरातील सराफा व्यापाऱ्यास लक्ष बनविले. त्यांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकून आपल्याला कुणाचीही भीती नसल्याचे दाखवून दिले. सदर चोरांच्या वाढलेल्या मनोबलामुळे पालम शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे.

Web Title: A jewellery shop was robbed at gunpoint in Mondya at Palam, jewels worth 20 lakhs looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.