एक महिन्यावर होता विवाह; नवीन घराच्या बांधकामावर पाणी टाकताना तरुणाचा शॉक बसून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:58 AM2024-03-29T11:58:23+5:302024-03-29T11:59:13+5:30
वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी पार पडणाऱ्या कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सोनपेठ ( परभणी) : नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना पाण्याच्या मोटरचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. किरण अशोक मस्के असे मृत तरुणाचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी पार पडणाऱ्या कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
किरण अशोक मस्के ( 32) याच्या घराचे बांधकाम सुरू होता. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बांधकामावर पाणी मारत असताना मोटरचा शॉक बसल्याने किरण गंभीर जखमी झाला. यास तत्काळ पुढील उपचारासाठी परळी येथील रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून किरणला मृत घोषित केले. त्याच्या पक्षात आई, भाऊ, बहीण-भाऊजी असा परिवार आहे.
एक महिन्यावर होता विवाह
काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर किरणवर घराची सर्व जबाबदारी आली होती. 28 एप्रिल रोजी त्याचा विवाह ठरला होता. परंतु, त्यापूर्वीच किरणचा दुर्दैवी मृत्यू झाला.