बॅनरवर फोटो लावण्याच्या वादातून तरुणाचा खून; तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 07:40 PM2022-11-08T19:40:17+5:302022-11-08T19:40:37+5:30
या प्रकरणी ११ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे
मानवत (परभणी ): बॅनरवर फोटो लावण्याच्या कारणावरून शहरातील 21 वर्षीय तरुणाचा तलवारीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री 9:30 वाजता घडली होती. याप्रकरणी ११ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुनानक जयंती निमित्त मानवत शहरात आठवडी बाजार रोडवर लावण्यात आलेल्या बॅनर फोटो लावल्याच्या वादातून बलरामसिंग बावरी या युवकांचा तलवारीने वार करून सोमवारी रात्री नऊ वाजता खून झाला होता. या प्रकारणी रविसिंग बावरी यांच्या तक्रारीवरून सुरजितसिंग सुलतानसिंग टाक, अर्जुनसिंग अरजितसिंग टाक, बलवानसिंग सुलतानसिंग टाक, मनजीतसिंग मायासिंग टाक, अनंदसिंग कन्हैया सिंग टाक, सुलतानसिंग कन्हैयासिंग टाक, रणबिरसिंग कन्हैयासिंग टाक, शेरसिंग कन्हैयासिंग, जुगनूसिंग कन्हैयासिंग टाक, सरजीतसिंग कन्हैयासिंग टाक, ललकारसिंग पुनमसिंग जुन्नी ( सर्व राहणार मानवत) यांच्यावर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश स्वामी हे करत आहेत.
दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून
सोमवारी रात्री झालेल्या खुनाच्या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते. मंगळवारी सकाळी अकरा वाजता अपर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी अविनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. मंगळवारी दिवसभर दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून होते.