४० हजार महिलांना ‘मातृवंदने’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:22 AM2021-09-05T04:22:14+5:302021-09-05T04:22:14+5:30
दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील अशा दोन्ही गटांतील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. आर्थिक विवंचनेमुळे गरोदरपणातही महिलांना काम करावे लागते. ...
दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील अशा दोन्ही गटांतील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. आर्थिक विवंचनेमुळे गरोदरपणातही महिलांना काम करावे लागते. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन प्रसूतीकाळात गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. या योजनेमुळे प्रसूतीकाळातील महिलांचे शारीरिक श्रम थांबले आहेत. शिवाय, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे.
सध्या जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृयोजना सप्ताह साजरा केला जात आहे. या अंतर्गत योजनेत जास्तीतजास्त महिलांना समाविष्ट करून घेतले जात आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी नुकताच या योजनेचा आढावा घेतला असून जास्तीतजास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
शहरी भागात लाभार्थ्यांची पाठ
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असला, तरी शहरी भागात मात्र लाभार्थ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील सर्वच शहरी भागांत एका वर्षात सरासरी १ हजार लाभार्थ्यांनीच लाभ घेतल्याचे समोर आले आहे. मागील पाच वर्षांत ५ हजार ३९५ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला असून, या लाभार्थ्यांच्या खात्यावर १ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांचे अनुदान आतापर्यंत जमा करण्यात आले आहे.
तालुकानिहाय जमा केलेले अनुदान
गंगाखेड : १८४८४०००
जिंतूर : २४६२७०००
मानवत : ८८१२०००
पालम ९०७००००
परभणी : २२९४००००
पाथरी : १५४३४०००
पूर्णा : १८६८३०००
सेलू : १३६९३०००
सोनपेठ : ७५१४०००
शहरी भाग : १९१५२०००