परभणी जिल्ह्याततूर उत्पादकांचे दहा कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:13 AM2018-03-18T00:13:15+5:302018-03-18T00:13:26+5:30

जिल्ह्यातील ६ हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १५ मार्चपर्यंत १८ हजार ४४३ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप १ हजार १९२ तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे नाफेडकडे जिल्ह्यातील तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. परिणामी तूर उत्पादक अडचणीत सापडला आहे.

About ten crore tired of Parbhani district's producers | परभणी जिल्ह्याततूर उत्पादकांचे दहा कोटी थकले

परभणी जिल्ह्याततूर उत्पादकांचे दहा कोटी थकले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ६ हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १५ मार्चपर्यंत १८ हजार ४४३ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप १ हजार १९२ तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे नाफेडकडे जिल्ह्यातील तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. परिणामी तूर उत्पादक अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यात यावर्षी तूर मोठ्या प्रमाणात उत्पादित झाली आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. तुरीची आवक वाढल्याने खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भावाने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परभणी तालुक्यासाठी शहरातील एमआयडीसी परिसरात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात नाफेडच्या वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर आतापर्यंत २ हजार ४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. १५ मार्चपर्यंत या केंद्रावर १ हजार ९९४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यासाठी जिंतूर शहरात हमीभाव खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून या केंद्रावर आतापर्यंत १ हजार ५३५ शेतकºयांनी नोंदणी केली असून या केंद्रावर सर्वाधिक ५ हजार २७३ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. गंगाखेड केंद्रावर २ हजार ६५७ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत या केंद्रावर ३ हजार ४२० क्विंटल ५० किलोची खरेदी झाली आहे. पूर्णा येथील हमीभाव खरेदी केंद्रावर तालुक्यातील ७६८ तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली असून आतापर्यंत ३ हजार ४९ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर २ हजार ६२६ तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली असून १५ मार्चपर्यंत ४६७ क्विंटल तुरीची सर्वात कमी खरेदी झाली आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक २ हजार ९२६ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत ४ हजार २३९ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.
१५ मार्चपर्यंत नोंदणी केलेल्या १२ हजार तूर उत्पादकांपैकी १ हजार १९२ शेतकºयांची तूर केंद्राच्या वतीने खरेदी करण्यात आली आहे. या तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. त्यामुळे नाफेडकडे थकलेल्या तूर उत्पादकांची देयके तत्काळ देण्यात यावीत, अशी मागणी तूर उत्पादक शेतकºयांतून होत आहे.
शुक्रवारच्या पावसाचा बसला फटका
शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात रिपरिप पाऊस होता. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी झाली नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांना शुक्रवारच्या पावसाचा फटका बसला आहे. पावसाळ्यासाठी तीन महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकºयांना उन्हाळ्यात जमिनीची मशागत करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकºयांतून होत आहे.

Web Title: About ten crore tired of Parbhani district's producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.