लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 06:12 PM2019-07-25T18:12:25+5:302019-07-25T18:14:10+5:30

आरोपीने पिडीतेच्या आई व भावास मारहाणही केली

Abuse of minor girl by displaying marriage ambitions;case Filed | लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

Next

परभणी : लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

यासंदर्भात पीडित मुलीने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी ज्ञानेश्वर लक्ष्मणराव चव्हाण (रा.विकास नगर) याने लग्नाचे अमिष दाखवून १ जुलै  ते २४ जुलै २०१९ या काळात शारीरिक संबंध ठेवले तसेच २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घरात घुसून मारहाण केली. आई व भाऊ हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून आरोपी ज्ञानेश्वर लक्ष्मणराव चव्हाण याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. जमादार जी.टी. माचेवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
 

Web Title: Abuse of minor girl by displaying marriage ambitions;case Filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.