फूस लावून आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:22 AM2021-09-06T04:22:22+5:302021-09-06T04:22:22+5:30
शहरी भागात थोडीशी तोंड ओळख झाली की त्यास मैत्रीचे नाव दिले जाते. अज्ञान व अल्पव्यात बौद्धिक क्षमता नसल्याने अनेकांचे ...
शहरी भागात थोडीशी तोंड ओळख झाली की त्यास मैत्रीचे नाव दिले जाते. अज्ञान व अल्पव्यात बौद्धिक क्षमता नसल्याने अनेकांचे निर्णय ही चचुकतात. २० अक्टोबर २०२० रोजीच्या पहाटे घरातून बाहेर पडलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातून गायब झाली. आईने तिचा शोध घेतला परंतु, सापडली नाही. चौकशी दरम्यान ती त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलासह इतर दोघे ज्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. अश्या तिघासोबत गेल्याची बाब पुढे आली. आईने या बाबत दिलेल्या तक्रारीत देवा सागर आगलावे,गणेश वाघमारे व एक अल्पवयीन मुलगी या तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलीचे अपहरण हे पोलिसांपुढे आव्हान होते. तापसधिकारी पोउपनि माणिक गुट्टे, त्यांचे सहकारी समीर पठाण,पोना मिलिंद कांबळे यांनी या घटनेच्या तपासाची चक्रे फिरवली. तिघांच्या संबधामधील मित्र, फोन लोकेशन व नातेवाइकांच्या चौकशी नंतर ते चौघे परभणी येथून पुणे येथे गेल्याचा सुगावा लागला. परंतु, तपासात ते पुढे हैद्राबाद येथे रवाना झाल्याचे कळाले. ते चौघे एक गाव सोडून दुसऱ्या गावाकडे प्रवास करीत असल्याने पोलिसांना तपास लावणे अवघड होतं होते. पंधरा दिवसानंतर त्यांचे लोकेशन हैद्राबाद येथे दाखवत होते. परंतु, त्याचा शोध काही लागत नव्हता. २४ नोव्हेंम्बर रोजी परत आरोपी हे हैद्राबाद लोकेशन मध्ये दाखवत असल्याने पोना मिलिंद कांबळे यांनी हैद्राबाद गाठले. मोबाईल लोकेशन मधील स्थान हे आरोपीच्या बहिणीच्या घराचे निघाले. यातील दोघे हे भोकर येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. भोकर पोलिसांच्या मदतीने आरोपी गणेश वाघमारे व एक अल्पवयीन मुलगी याना पूर्णा येथे आणल्यानंतर त्यांनी दुसरी अल्पवयीन मुलगी व देवा हे सिरसाळा (बीड) येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांना २७ नोव्हेबर रोजी सिरसाळा येथून ताब्यात घेतले.
चुकीच्या निर्णयामुळे आयूष्य उध्वस्त
पूर्णा येथे पीडित मुलीने आपबीती सांगितली. तिने सांगितले की देवा आगलावे यांनी आपणांस पळून जाऊन लग्न करू असे म्हणून नेले होते. हैद्राबाद येथे असताना त्याने आपल्याशी शारीरिक सबंध ठेवल्याचा खुलासा केला. या जवाबा नंतर पूर्वी अपहरणाचा दाखल झालेल्या गुन्ह्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार विरोधी गुन्हा दाखल झाला. पुढे हा तपस पोनि प्रवीण धुमाळ यांच्याकडे वर्ग करण्यात आला. मुलीला तिच्या आईकडे स्वाधीन करण्यात आले. तर दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.बाल वयात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कसे आयुष्य उध्वस्त होते. हे या घटनेतून स्पष्ट होत होते.