मालवाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅव्हल्सवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:20 AM2021-09-23T04:20:25+5:302021-09-23T04:20:25+5:30
परभणी जिल्ह्यातून दररोज ५० पेक्षा अधिक ट्रॅव्हल्स इतर शहरांत जातात. या सर्व ट्रॅव्हल्सला फक्त प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. असे ...
परभणी जिल्ह्यातून दररोज ५० पेक्षा अधिक ट्रॅव्हल्स इतर शहरांत जातात. या सर्व ट्रॅव्हल्सला फक्त प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. असे असताना काही ट्रॅव्हल्समधून प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यासाठी असलेल्या जागेत विविध माल किंवा अन्य साहित्य ठेवून व्यावसायिक पद्धतीने त्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी काही ट्रॅव्हल्सची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने तपासणी केली. त्यामध्ये एमएच २३ एयू ७७०४, एमएच २३ डब्यू ४०८४ आणि जीजे ०५ बीएक्स ९०२३ या तीन ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या बॅगा ठेवण्याच्या जागी इतर व्यावसायिक माल आढळून आला. ही बाब ट्रॅव्हल्स चालविण्याच्या वेळी घालून दिलेल्या नियमांचा भंग करणारी असल्याने या तिन्ही वाहनांवर कारवाई करण्यात आली. या ट्रॅव्हल्सचे परवाने निलंबित करण्याची शिफारस परिवहन आयक्तांकडे करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.