मास्क न वापरणाऱ्या ४० जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:24+5:302021-02-23T04:26:24+5:30
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन पुन्हा एकदा मास्क वापरण्यासाठी सक्ती करत आहे. याअनुषंगाने २२ फेब्रुवारी रोजी भरणारा ...
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन पुन्हा एकदा मास्क वापरण्यासाठी सक्ती करत आहे. याअनुषंगाने २२ फेब्रुवारी रोजी भरणारा आठवडी बाजार रद्द झाल्याने शहरातील विविध दुकानांवर ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची गर्दी दिसून आली. या गर्दीत आलेले नागरिक मास्क न वापरता बिनधास्तपणे फिरत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे, अभियंता सय्यद अनवर, अमोल तांदळे, ओम चव्हाण, सचिन पवार, शेषराव बोरेवाड, शाकिर अली, शतानिक जोशी, संतोष खरात, एकनाथ जाधव, दीपक भदर्गे, सुनील कीर्तने, दीपक सातभाई, अरुण वीर, आर. डी. झोडपे, सुभाष लांडगे, सचिन पवार, सय्यद मीर, पंकज पवार, सचिन सोनवणे, एस. एस. काळे, ए. एस. वाडकर, मनमोहन बारहाते, बळीराम दहे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश पथकात करण्यात आला आहे. या पथकाने शहरातील मुख्य रस्ता, भाजी मार्केट व बाजारपेठ भागात जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत असणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली. मास्क न वापरणाऱ्या ४० नागरिकांकडून प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे ४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, कोरोना पुन्हा वाढत असल्याने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी केले आहे.
प्लास्टिक कॅरीबॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड
सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक कॅरीबॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. शहरातील विविध ५ व्यापाऱ्यांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.