पूर्णा येथे अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हाधिका-यांची पहाटे कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 01:01 PM2017-12-16T13:01:44+5:302017-12-16T13:02:07+5:30
पूर्णा तालुक्यात चोरट्या रेती वाहतुकीबाबत महसूल प्रशासनाची मोहीम सुरू आहे. यात आज जिल्हाधिकारी पी शिवषणकर यांनी पहाटे 4 वाजता खरबडा, वझुर तर परभणी तालुक्यातील धामणी येथे कारवाई केली.
परभणी : पूर्णा तालुक्यात चोरट्या रेती वाहतुकीबाबत महसूल प्रशासनाची मोहीम सुरू आहे. यात आज जिल्हाधिकारी पी शिवषणकर यांनी पहाटे 4 वाजता खरबडा, वझुर तर परभणी तालुक्यातील धामणी येथे कारवाई केली.
जिल्हाधिकारी पी शिवषणकर यांनी पहाटे केलेल्या या कारवाईत खरबडा शिवारात चोरटी वाहतूक करणारे टिपर आढळून आले. वझुर शिवारात रेती साठा व एक टिपर आढळले. यानंतर त्यांनी पूर्णा येथील तहसीलदार श्याम मंदनूरकर यांना माहिती देताच ते आपल्या पथकासह घटना स्थळी दाखल झाले. तसेच परभणी तालुक्यात येणाऱ्या धामणी गाव शिवारात ही जिल्हाधिका-यांना रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर आढळले.
या कारवाईतील सर्व वाहने ताडकळस पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत. यावर प्रत्येकी 30 हजार आठशे रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्याम मंदनूरकर यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडाकेबाज मोहिमेने वाळू माफियांच्या धाबे दणाणले आहेत. मागील काही दिवसात तहसीलदारांनी सुद्धा वाळू माफियांवर जोरदार कारवाई केली आहे.