कर्मचाऱ्यांनी लस न घेतल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:11+5:302021-06-11T04:13:11+5:30
कोरोनाच्या अनुषंगाने शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, ...
कोरोनाच्या अनुषंगाने शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.व्ही.आर. पाटील, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रावजी सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कालिदास निरस, कुष्ठरोगाच्या सहाय्यक संचालक डॉ. विद्या सरपे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनावर लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे; परंतु प्रशासनाचे प्रतिनिधी असलेल्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांनी लस घेतली नाही तर ती बाब गंभीर आहे. जिल्ह्यात १० टक्के कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतली नाही. या कर्मचाऱ्यांसाठी ११ जून रोजी जिल्हाभरात तालुकानिहाय लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे. या सत्रात कर्मचाऱ्यांनी लस न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत शिवानंद टाकसाळे यांनी दिले. लोकांचे जनजीवन सामान्य होण्यासाठी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असणे आवश्यक आहे. तेव्हा आरटीपीसीआर तपासण्या वाढविण्यावर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याच बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रनिहाय तपासण्यांचा आढावा घेण्यात आला.