परभणीत सात दुकानांवर मनपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:21 AM2019-03-13T00:21:08+5:302019-03-13T00:21:26+5:30
प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्लास्टिक आणि थर्मोकॉलच्या वापरास राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर शहरात होत असल्याने याविरुद्ध मनपाने मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी राबविलेल्या मोहिमेत शहरातील हॉटेल सवेरा, सलीम किराणा दुकान, युसूफ कुरेशी यांच्या दुकानावर कॅरीबॅग आढळल्या. त्यामुळे या तीन व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांकडून दंड वसूल केला. तसेच गणपती चौक, जिंतूर रोड, गंगाखेड नाका, पोलीस क्वॉर्टर या भागातील मोहम्मद इलियास मो. इस्माईल, लकी ज्यूस, लक्ष्मी कोल्ड्रींक, शिवाजी कॉलेज परिसरातील कॉफी सेंटरवर छापा टाकून दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात केलेल्या कारवाईतून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा, पथक प्रमुख विनय ठाकूर, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेहराज अहेमद, मोहम्मद शादाब, नयनरत्न घुगे, शेख इस्माईल, किरण गायकवाड, युवराज साबळे, कदम आदी कर्मचाºयांनी ही कारवाई केली. दरम्यान, कॅरीबॅगचा वापर होत असलेल्या दुकानांना सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिले असून, या कामात कुचराई करणाºया कर्मचाºयांवरही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.