रणजित पाटील यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:17+5:302021-07-07T04:22:17+5:30
मुंबई येथे भाजपचे माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, अजय गव्हाणे, लिंबाजीराव भोसले यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट ...
मुंबई येथे भाजपचे माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, अजय गव्हाणे, लिंबाजीराव भोसले यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव रणजित अण्णासाहेब पाटील यांनी त्यांना लागू नसलेली वेतनश्रेणी घेऊन २१ लाख रुपये उचलल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी रणजित पाटील यांचा मूळ विभाग असलेल्या गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर १ जुलै रोजी पत्र पाठवले असून या पत्रात २३ जुलै रोजी माजी आ. विजय गव्हाणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रणजित पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पाटील हे सध्या परभणी महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता काय कारवाई होते, याकडे कृषी विद्यापीठ व मनपातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.