नळजोडणीसाठी बनविला जाणार कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:37+5:302021-07-23T04:12:37+5:30
या अभियानात २२ जुलै रोजी कार्यकारी अभियंता उपअभियंता, शाखा अभियंता यांना गाव कृती आराखडा निर्माण करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार ...
या अभियानात २२ जुलै रोजी कार्यकारी अभियंता उपअभियंता, शाखा अभियंता यांना गाव कृती आराखडा निर्माण करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. २३ ते २७ जुलै या काळात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, मनुष्यबळ विकास सल्लागार यांच्यासह तालुकास्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. २८ ते ३१ जुलै या काळात सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक यांना गाव कृती आराखडा कसा तयार करावा याबाबत माहिती दिली जाणार आहे, तर ५ ते ७ ऑगस्ट या काळात कृती आराखड्याची निर्मिती व पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये या आराखड्याला मंजुरी घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी दिली.