बाजारपेठेत करून जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:18 AM2021-02-24T04:18:33+5:302021-02-24T04:18:33+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढत असून, प्रशासनाने या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मास्कचा ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असून, प्रशासनाने या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे आणि सॅनिटायझर वापरण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेचे १५ पथकेही स्थापन केले आहेत. असे असतानाही शहरात अनेक भागांत नागरिक विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे स्वतः बाजारपेठ भागात फिरले. यावेळी अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी काही नागरिकांना कठोर सूचना दिल्या, तर काहींवर दंडात्मक कारवाई केली. आर. आर. टॉवर, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ या परिसरात मुगळीकर यांनी ही कारवाई केली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्यासह महानगरपालिकेतील कर्मचारीही पथकात सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर बाजारपेठेत कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यास नागरिकांनी सुरुवात केली.