कोरोनाच्या १६ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:07+5:302021-01-08T04:53:07+5:30
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नवीन १६ रुग्णांची जिल्ह्यात भर पडली असून, १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाने ...
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नवीन १६ रुग्णांची जिल्ह्यात भर पडली असून, १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढविल्या असल्या तरी रुग्णांचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. ७ जानेवारी रोजी १ हजार ९८३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत १२ आणि रॅपिड ॲन्टिजन टेस्टमध्ये चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आता ७ हजार ६६८ एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ७ हजार २९१ कोरोनामुक्त झाले. ३०६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ७१ रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी दिवसभरात ३ हजार १०८ नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यात १ हजार ४८३ नागरिकांचे स्वॅब नमुने जिल्हास्तरावर घेण्यात आले आहेत. या सर्व स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
७ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये परभणी शहरातील संभाजीनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, गव्हाणे चौकातील ५५ वर्षीय पुरुष, अमेयनगरातील ३५ वर्षीय पुरुष, गव्हाणे रोड भागातील ७६ वर्षीय वृद्ध, दत्तनगर जिंतूर रोड भागातील ६० वर्षीय पुरुष, निवळी बु. येथील ८० वर्षीय वृद्ध, शहरातील कल्याणनगर येथील ४६ वर्षीय पुरुष, गव्हाणे रोड भागातील ४१ वर्षीय महिला, सत्कार काॅलनीतील २१ वर्षीय युवती, ६८ वर्षांची वृद्ध महिला, अपना कॉर्नर भागातील ६८ वर्षांची वृद्ध महिला, प्रतापनगरातील १६ वर्षांचा बालक, जिंतूर शहरातील जवाहर कॉलनीतील ६८ वर्षीय पुरुष, तालुक्यातील इटोली येथील २० वर्षांची युवती, ५१ वर्षांचा पुरुष, सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील ३५ वर्षांच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कुठे आढळले किती रुग्ण
परभणी तालुका : १२
जिंतूर तालुका : ०३
सेलू तालुका : ०१