जिल्ह्यात ४३ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:19+5:302021-03-14T04:17:19+5:30

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असून, शनिवारी ४३ नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने ...

Addition of 43 new patients in the district | जिल्ह्यात ४३ नव्या रुग्णांची भर

जिल्ह्यात ४३ नव्या रुग्णांची भर

Next

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असून, शनिवारी ४३ नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहेत.

मागच्या दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी आरोग्य विभागाला १ हजार ४८९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार ३२८ अहवालात १० जण पॉझिटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे रॅपिड टेस्टच्या १६१ अहवालात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता ९ हजार १८६ रुग्णसंख्या झाली असून, त्यातील ८ हजार ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३४२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३२७ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ११८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर खासगी रुग्णालयांत ११७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ९४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

या भागात नोंद झाले रुग्ण

परभणी शहरातील वैभवनगर, हडको, कच्छी बाजार, उड्डाणपुलाजवळ, शिवरामनगर, गणेशनगर, गणपती चौक, आनंदनगर, धाररोड, दर्गा रोड, धाररोड, परभणी तालुक्यातील आर्वी, सेलू शहरातील मारोतीनगर, तालुक्यातील देऊळगाव गात, सह्याद्रीनगर, शंकरवाडी, गणेशनगर, गायत्रीनगर, मंत्री कॉलनी, पालम तालुक्यातील वाडी बु., पूर्णा शहरातील मोंढा, गंगाखेड शहरातील आरबुजवाडी, लेक्चरर कॉलनी, जनाबाईनगर, मानवत शहरातील बारहाते गल्ली आदी भागात रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Addition of 43 new patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.