जिल्ह्यात ८ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:49+5:302020-12-08T04:14:49+5:30

परभणी : जिल्ह्यात सोमवारी ८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या ...

Addition of 8 patients in the district | जिल्ह्यात ८ रुग्णांची भर

जिल्ह्यात ८ रुग्णांची भर

Next

परभणी : जिल्ह्यात सोमवारी ८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. आरोग्य विभागाने सोमवारी २९२ नागरिकांच्या आरटीपीसीआर तर ७३ नागरिकांच्या रॅपिड तपासण्या केल्या. त्यात ८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोराेनावर उपचार घेणाऱ्या २३ रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आता ७ हजार २७३ एकूण रुग्ण झाले असून, त्यापैकी ६ हजार ८३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २९१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या १४८ रुग्ण उपचार घेत आहेत.

या भागात आढळले रुग्ण

सोमवारी नोंद झालेले सर्व ८ रुग्ण परभणी तालुक्यातील आहेत. त्यामध्ये समता कॉलनीतील ७० वर्षीय वृद्ध, कारेगाव रोड भागातील दत्त नगर येथील ७० वर्षीय वृद्ध, संगम कॉलनीतील ३० वर्षांचा युवक, वसमत रोडवरील समता कॉलनीतील ६५ वर्षांची वृद्ध महिला, कारेगाव रोड भागातील ८ वर्षांचा बालक, जुना पेडगाव रोड भागातील २२ वर्षीय युवक आणि तालुक्यातील टाकळी बोबडे येथील एका ६२ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आयटीआयमध्ये २८ रुग्णांवर उपचार

परभणी : येथील आयटीआय परिसरातील कोरोना रुग्णालयात २८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्याचप्रमाणे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात ५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ५, पूर्णा ग्रामीण रुग्णालयात ३, सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात १ रुग्ण उपचार घेत आहे. तसेच परभणी शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये १७ रुग्ण उपचार घेत आहेत.

८७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

परभणी : जिल्ह्यात सध्या १४८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ८७ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागाने रुग्णांसाठी होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ५० वर्षांपेक्षा कमी वय असणारे रुग्ण आणि ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे कमी आहेत, अशा रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागाने महिनाभरापूर्वी ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, सद्यस्थितीला निम्म्यापेक्षा अधिक रुगण त्यांच्या घरीच उपचार घेत आहेत.

१ हजार ६०० खाटा रिक्त

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी १ हजार ७५७ खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र मागील महिनाभरापासून संसर्ग कमी झाल्याने रुग्णांची संख्या घटली आहे. परिणामी रुग्णांसाठी उपलब्ध केलेल्या रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीला १ हजार ६०९ खाटा रिक्त आहेत. त्यात शहरात आयटीआय हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक १७२ खाटा रिक्त आहेत. या शिवाय इतर रुग्णालयांमध्येही रिक्त खाटांचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Addition of 8 patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.