फक्त पद वर्ग दोनचे, वेतन तसे नाही; नायब तहसीलदारांचे वर्ग दोनच्या वेतन वाढीसाठी आंदोलन
By ज्ञानेश्वर भाले | Published: April 3, 2023 05:38 PM2023-04-03T17:38:48+5:302023-04-03T17:39:05+5:30
महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग दोन हे महत्त्वाचे पद आहे.
परभणी : जिल्हासह राज्यभरातील नायब तहसीलदारांना वर्ग दोनच्या वेतनवाढीचा लाभ द्यावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. वारंवार मागणी करून देखील संबंधित संवर्गांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित आंदोलन करण्यात आले.
महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग दोन हे महत्त्वाचे पद आहे. परंतु नायब तहसीलदार पदाचे वेतन राजपत्रित वर्ग दोनचे नाही. त्यामुळे वर्ग दोनच्या वेतनासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सारंग चव्हाण, गणेश चव्हाण, पल्लवी टेमकर, दिनेश झांपले, प्रशांत वाकोडकर, लक्ष्मीकांत खळीकर, कैलास वाघमारे, अनिल घनसावंत यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.