गंगाखेड येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 06:54 PM2018-11-23T18:54:36+5:302018-11-23T18:58:22+5:30
मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
गंगाखेड (परभणी ) : मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यासाठी तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक व शासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षण द्यावे, सच्चर समिती, डॉ. रहेमान समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करावी आदी विविध मागण्यांसाठी आज दुपारी अडीच वाजता जमिअत ए उलेमा हिंद शाखेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी नायब तहसिलदार यशवंतराव गजभारे यांना निवेदन सादर केले.
या निवेदनावर हाफीज मो. नदीम सिद्दीकी, मौलाना कलिम नदवी, हाफीज अ. खालेक, अब्दुल वहाब, शेख मजहरोद्दीन, सय्यद महेताब, शेख उस्मान, हाफीज सज्जाद खान, शेख सादेक, मुस्तफा खुरेशी, मोहसीन खान, हाफीज सय्यद याखुब, अजीज खान, शेख आराफत, सय्यद वसीम, शेख अजहर, हाफीज सय्यद युसुफ, अब्दुल हमीद खुरेशी, शेख नयुम, वहाजखान पठाण, रिहान खुरेशी, शेख समीर, सय्यद खालेद, अड. सय्यद सोहेल, सलावद्दीन नाना, तबरेज खान, हाफीज अब्दुल गफार, शेख निसार, हाफीज शेख मुख्तार, सिकंदर खान आदी सह बहुसंख्य मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.