परभणीत न.प.कर्मचाºयांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:43 AM2017-12-23T00:43:54+5:302017-12-23T00:44:03+5:30
नगरपालिकेतील कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासून थकित असलेले वेतन व डीएच्या फरकातील रक्कम तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी २२ डिसेंबरपासून पालिकेतील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी ): नगरपालिकेतील कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासून थकित असलेले वेतन व डीएच्या फरकातील रक्कम तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी २२ डिसेंबरपासून पालिकेतील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
पूर्णा नगरपालिकेतील वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाºयांची संख्या ११८ आहे. या कर्मचाºयांचे जवळपास ४ महिन्यांपासून वेतन थकित आहे. सोबतच डीएची रक्कमही थकित असून या कर्मचाºयांना आर्थिक अडचणीस तोंड द्यावे लागत आहे. थकित वेतनाबाबत मुख्याधिकाºयांना वेळोवेळी सूचना करण्यात आल्या. मात्र पालिका प्रशासनाने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे २२ डिसेंबरपासून पालिका कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मराठवाडा नगरपालिका व महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवारी न.प.मुख्याधिकारी पंकज पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष उत्तम कांबळे, बेबीताई वारगडे, पार्वतीबाई असोरे आदींची उपस्थिती होती.