केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीत करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:02+5:302021-07-07T04:22:02+5:30
येथील काँग्रेस भवनमध्ये ५ जुलै रोजी ओबीसी विभागाची कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी प्रा.माळी बोलत होते. अध्यक्षस्थानी ...
येथील काँग्रेस भवनमध्ये ५ जुलै रोजी ओबीसी विभागाची कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी प्रा.माळी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा.तुकाराम रेंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ शेळके, लियाकत अली अन्सारी, प्रेरणाताई वरपूडकर, मलेका गफार, भगवान कोळेकर, संतोष रसाळकर, श्रीधर देशमुख, मिनहाज कादरी, नागेश सोनपसारे, पवन निकम, केशवराव बुधवंत, बाळासाहेब फुलारी, शिवसांभ देशमुख, ॲड.मुजाहीद, रुस्तुमराव वंजे आदींची उपस्थिती होती.
प्रा.भगवान माळी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारची भूमिका खोटे बोल पण रेटून बोल, अशी आहे. केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे एक लाख ओबीसी कार्यकर्ते घेऊन आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.तुकाराम साठे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रेरणाताई वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले. उद्धव रामपुरीकर यांनी सूत्रसंचालन केले. इंजिनिअर सुहास पंडित यांनी आभार मानले. यावेळी देवराव हरकळ, कल्याण लोहट, बालासाहेब भांगे, शेख मतीन, राजेश रेंगे, वाजेद जहागीरदार, दिगंबर खरवडे, जगन्नाथ देवकते, भारत कच्छवे, नारायण जाधव, विलास सत्वधर, निवृत्ती गोरे, माऊली काजळे, गणेश हरगुंडे आदी उपस्थित होते.