वाहनाची धडक देत अडवून भररस्त्यात कृषी अधिकाऱ्याला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 07:59 PM2018-02-28T19:59:28+5:302018-02-28T20:00:39+5:30

पूर्णा येथे नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकारी यांच्या गाडीला धडक देत त्यांना भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी झिरो फाटा येथे घडली. 

agri officer beaten by unknown at purna | वाहनाची धडक देत अडवून भररस्त्यात कृषी अधिकाऱ्याला मारहाण 

वाहनाची धडक देत अडवून भररस्त्यात कृषी अधिकाऱ्याला मारहाण 

googlenewsNext

परभणी : पूर्णा येथे नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकारी यांच्या गाडीला धडक देत त्यांना भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी झिरो फाटा येथे घडली. जि.इ. खूपसे पाटील असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नवा असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालय परभणी येथे पुढील उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाटील हे काही दिवसांपूर्वीच पूर्णा येथे कृषी अधिकारी पदावर रुजू झाले आहेत. मंगळवारी कार्यालयीन कामकाजानंतर सायंकाळी परभणी येथे बैठकीसाठी जात होते. झिरो फाटा येथे आले असता त्यांच्या वाहनास अज्ञात वाहनाने मागील बाजूने धडक दिली. यानंतर त्या गाडीतून काही अज्ञात व्यक्तीने उतरून पाटील यांना काही कळण्याच्या आता मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर मारहाणकर्ते तेथून पसार झाले. 

या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनेच्या निषेधार्थ राज्य कृषी सहाय्यक संघटना परभणी यांच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले देण्यात आले असून आरोपीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
 

Web Title: agri officer beaten by unknown at purna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी