ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला, साखर महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:15+5:302021-08-13T04:22:15+5:30
परभणी शहरात किराणा मर्चंट असोसिएशन अंतर्गत जवळपास ५०० ते ६०० दुकाने आहेत. सर्वच दुकानांवर साखरेची विक्री होते. दर महिन्याला ...
परभणी शहरात किराणा मर्चंट असोसिएशन अंतर्गत जवळपास ५०० ते ६०० दुकाने आहेत. सर्वच दुकानांवर साखरेची विक्री होते. दर महिन्याला साखरेच्या दरामध्ये काहीशी वाढ होत असल्याचे सध्या दिसून येते. जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत ही वाढ सातत्याने होत असल्याने ग्राहकांना याचा फटका बसत आहे.
जिल्ह्याला दररोज लागते साखर २०० क्विंटल
श्रावण महिन्यात वाढली मागणी २५० क्विंटल
साखरेचे दर (प्रति किलो)
जानेवारी ३४
फेब्रुवारी ३४
मार्च ३३
एप्रिल ३४
मे ३५
जून ३५
जुलै ३६
ऑगस्ट ३६
सहा महिन्यांत २०० रुपये क्विंटलची वाढ
जानेवारी महिन्यात साखरेचा दर जवळपास ३३०० रुपये क्विंटल होता. हाच दर ऑगस्ट महिन्यात ३६०० रुपये क्विंटलपर्यंत गेला आहे. साधारणतः दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलमागे भाव वाढले आहेत. यानंतर बाजारात किलोमागे काही प्रमाणात दर वाढलेले असतात.
सोलापूरहून येते साखर
परभणी शहरात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर या भागातील साखर येते, तसेच मराठवाड्यातील लातूर येथूनही साखरेची आवक होते. वाहतुकीचा खर्च, तसेच लागणारा कर व वाढलेले दर यामुळे सर्वसामान्यांना साखर महाग मिळते.
दर महिन्याला ५ किलो, तसेच १० किलो साखर आवश्यकतेप्रमाणे खरेदी केली जाते. सणासुदीत ही मागणी वाढते. मात्र, एकदाच साखर खरेदी करताना दराकडे बघितले जात नाही. यामुळे किती प्रमाणात भाव वाढला ते कळत नाही. मात्र, सरासरी एक ते दोन रुपये दर महिन्याला वाढत असल्याचे समजते. - रेवती मिसाळ.