आरटीओच्या पथकात वायुवेग तपासणी वाहन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:11+5:302021-09-04T04:22:11+5:30
परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर अत्यंत वेगाने वाहने चालविली जात आहेत. ...
परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर अत्यंत वेगाने वाहने चालविली जात आहेत. परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याअनुषंगाने येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी परिवहन विभागाकडे वायुवेग तपासणी वाहनाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्याला हे वाहन राज्य रस्ता सुरक्षा निधीतून वाहन प्राप्त झाले आहे. या वाहनांमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्पीड गन, ब्रेथ ॲनालायझर, व टींट मीटर उपकरणे, इंटिग्रेटेड कॅमेरा बसविण्यात आला आहे. ठरवून दिलेल्या विशिष्ट क्षमतेपेक्षा अधिक वेगाने हे रस्त्यावर वाहन चालविल्यास प्राप्त झालेले हे वाहन सदरील वाहनाची वेग मर्यादा मोजते. त्यानंतर ते संबंधित वाहनावर १ हजार रुपयांचा दंड ऑनलाईन आकारते. या अत्याधुनिक वाहनामुळे अवैध वाहनांवरील कारवाई वेगवान होईल, रस्ते सुरक्षा नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल तसेच अपघातमुक्त परभणी जिल्हा यासाठी प्रयत्न करता येतील, असे या अनुषंगाने बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी सांगितले.