प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची सर्वच पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:24+5:302021-09-08T04:23:24+5:30
पाटेकर यांना कार्यमुक्त करू नका : सुभाष कदम प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर यांची अकोला येथे बदली झाली असली तरी ...
पाटेकर यांना कार्यमुक्त करू नका : सुभाष कदम
प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर यांची अकोला येथे बदली झाली असली तरी त्यांच्या जागी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पाटेकर यांना कार्यमुक्त केल्यास या विभागाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन अधिकारी येईपर्यंत पाटेकर यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी जि.प. सीईओंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अधिकारी-पदाधिकाऱ्यांना पाटेकर यांच्या पदमुक्तीची घाई
प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर यांनी काही अर्थपूर्ण प्रकरणांमधील फाईलींवर सह्या केलेल्या नाहीत. त्यात गंगाखेड येथील एका खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या जुन्या तारखेत रुजू झाले नसतानाही पगार काढण्याच्या प्रकरणाची फाईल, तसेच परभणी येथील एका खासगी अनुदानित शाळेत विनाअनुदानित तुकडीवर नियुक्त शिक्षिकेला नियमबाह्यरीत्या अनुदानित तुकडीवर नियुक्ती दिल्याच्या प्रकरणातील फाईलचा समावेश आहे. पाटेकर या कार्यमुक्त झाल्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यामार्फत अर्थपूर्ण व्यवहाराच्या फाईल मंजूर करून घेण्याचा काही अधिकारी व पदाधिकारी यांचा इरादा आहे. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याची घाई जि.प.त सुरू आहे.