वाणी संगमच्या गोदावरी नदीत आढळली मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:22 PM2024-03-09T14:22:10+5:302024-03-09T14:22:25+5:30

गावातील सोमनाथ काळे व भगवान मस्के पाटील हे दररोज जुने वाणी संगमच्या गोदावरी नदीजवळील श्रीवाघेश्वर मंदिरात दर्शनास जातात. गुरुवारी सकाळी ६:३० वाजता हे दोघे गोदावरी नदीच्या काठी गेले होते. यावेळी नदीत गाळात रुतून बसलेली मूर्ती सोमनाथ काळे यांना दिसली. 

An idol found in the river Godavari of Vani Sangam | वाणी संगमच्या गोदावरी नदीत आढळली मूर्ती

वाणी संगमच्या गोदावरी नदीत आढळली मूर्ती

सोनपेठ (जि. परभणी) : शहरापासून जवळ असलेल्या जुने वाणी संगम येथील गोदावरी नदीतील गाळात गुरुवारी एक मूर्ती आढळून आली. या प्रकारानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली  होती. या मूर्तीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.  

गावातील सोमनाथ काळे व भगवान मस्के पाटील हे दररोज जुने वाणी संगमच्या गोदावरी नदीजवळील श्रीवाघेश्वर मंदिरात दर्शनास जातात. गुरुवारी सकाळी ६:३० वाजता हे दोघे गोदावरी नदीच्या काठी गेले होते. यावेळी नदीत गाळात रुतून बसलेली मूर्ती सोमनाथ काळे यांना दिसली. 

ही मूर्ती हातात त्रिशूळ व डमरू घेतलेली असून घोड्यावर बसलेली आहे. ही मूर्ती शैव देवतांपैकी खंडोबाची मूर्ती असल्याचा अंदाज आहे. तिच्या उजव्या हातातील खंडा भग्न झालेला तर डाव्या हातात पान पात्र आहे. मूर्ती भग्न झाल्याने ती  विसर्जित करण्यात आली असावी.

Web Title: An idol found in the river Godavari of Vani Sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी