... अन् परभणीत दूध संकलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:05 AM2019-01-07T01:05:40+5:302019-01-07T01:06:08+5:30
येथील एमआयडीसी परिसरातील शासकीय दूध डेअरीवर मागील काही दिवसांपासून ठप्प पडलेले दूध संकलन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नानंतर शनिवारपासून पूर्ववत सुरू झाले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील एमआयडीसी परिसरातील शासकीय दूध डेअरीवर मागील काही दिवसांपासून ठप्प पडलेले दूध संकलन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नानंतर शनिवारपासून पूर्ववत सुरू झाले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला़
येथील शासकीय दूध डेअरीमध्ये ५० सहकारी संस्थांच्या माध्यमातून दररोज सुमारे ४५ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते़ गेल्या काही महिन्यांपासून वीज, पाणी आणि डिझेलसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने येथील दूध संकलन बंद करण्यात आले़
त्यामुळे परभणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ५ जानेवारी रोजी आ़ डॉ़ राहुल पाटील यांना या संदर्भात माहिती दिली़ त्यानंतर तक्रारकर्त्या शेतकºयांसह आ़ डॉ़ राहुल पाटील व शिवसेना पदाधिकाºयांनी शासकीय दूध डेअरीमध्ये जाऊन जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांना या प्रकरणी जाब विचारला़ मागील काही महिन्यांपासून वीज बिलाचे ५ लाख रुपये आणि डिझेल बिलाचे साडेचार लाख रुपये शासनाकडून मिळाले नसल्याने दूध संकलन बंद असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले़ यावर डॉ़ पाटील यांनी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संपर्क साधला़
या प्रश्नावर राज्यमंत्री खोतकर, आ.डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ८ जानेवारी रोजी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन खोतकर यांनी दिले़ मात्र तोपर्यंत परभणी येथील दूध संकलन सुरू ठेवण्याचे आदेशही दिले. त्यामुळे या डेअरीमध्ये दूध संकलनास सुरुवात झाली आहे़
या प्रसंगी गंगाप्रसाद आणेराव, नंदू पाटील, संदीप झाडे, फैजुल्ला पठाण, सरपंच गोपीनाथ झाडे, शिवाजीराव चोपडे, दामोदर सानप, बाळासाहेब डुकरे, गजानन चट्टे, सुभाष जोंधळे आदींची उपस्थिती होती़