परभणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:40+5:302021-09-25T04:17:40+5:30
आयटक संलग्न महाराष्ट्र अंगणवाडी, बालवाडी, कर्मचारी युनियन, आरोग्य विभाग, आशा व गट प्रवर्तक संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या ...
आयटक संलग्न महाराष्ट्र अंगणवाडी, बालवाडी, कर्मचारी युनियन, आरोग्य विभाग, आशा व गट प्रवर्तक संघटना, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १८०० रुपये मानधन द्यावे व सेवेत कायम करावे, १ सप्टेंबर २०२१ पूर्वी लागू असलेला कोविड प्रोत्साहन भत्ता आशा, गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावा, यासह विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. या आंदोलनात ॲड. माधुरी क्षीरसागर, राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरूड, वंदना हाके, सविता काळबांडे, सुनीता कुरवाडे, ज्योती कुलकर्णी, अर्चना फड, ताहेरा बेगम, सीमा देशमुख, सुनीता धनले, वर्षा चव्हाण, सविता ढाले, संगीता ढवळे आदींसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.