कारवाईच्या धोरणामुळे पशुधन पदवीधारकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:20 AM2021-07-14T04:20:59+5:302021-07-14T04:20:59+5:30
जिल्ह्यातील या पदवीधारकांनी हा प्रश्न आ. मेघना बोर्डीकर यांच्याकडे मांडला आहे. महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खात्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदावर ...
जिल्ह्यातील या पदवीधारकांनी हा प्रश्न आ. मेघना बोर्डीकर यांच्याकडे मांडला आहे. महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खात्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदावर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन शासनमान्य पदविका उत्तीर्ण असलेले पदवीधारक काम करतात. गाय, म्हशींमध्ये कृत्रिम रेतन करणे, गर्भ तपासणी करणे, व्यंधत्वावर साधारण उपचार करणे, जनावरांचे लसीकरण करणे, जखमा धुणे, मलमपट्टी करणे आदी कामे पशुधन पर्यवेक्षकामार्फत केली जातात. राज्यात हजारोंच्या संख्येने पशुधन पर्यवेक्षक बेरोजगार आहेत. या बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेच्या सूचनेवरून बोगस पशुवैद्यक डॉक्टर म्हणून कारवाई केली जात आहे. त्यामुळे ही बाब अन्यायकारक असून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आ. मेघना बोर्डीकर यांना दिलेल्या निवेदनावर दैवत लाटे, नंदकिशोर देशमुख, ज्ञानेश्वर सामाले, अनिल कानडे, विजयकुमार हातागळे, विष्णू वैद्य, सुनील ठाकूर, नारायण जोगदंड, विशाल राठोड आदींची नावे आहेत.