परभणी जिल्ह्यात चारठाणा येथे पशू प्रदर्शन : ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:26 AM2018-01-07T00:26:57+5:302018-01-07T00:27:05+5:30

शेतकºयांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे़ यासाठी पशूधनाची काळजी घेणे गरजेचे आहे़ तसेच पशू संवर्धन विभागाने ग्रामीण भागात सुविधा पोहोचवून गावातच पशूधनावर उपचार करावेत, असे आवाहन आ़ विजय भांबळे यांनी केले़

Animal exhibition at Charthana in Parbhani district: Provide health facilities to rural areas | परभणी जिल्ह्यात चारठाणा येथे पशू प्रदर्शन : ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवा

परभणी जिल्ह्यात चारठाणा येथे पशू प्रदर्शन : ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा : शेतकºयांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे़ यासाठी पशूधनाची काळजी घेणे गरजेचे आहे़ तसेच पशू संवर्धन विभागाने ग्रामीण भागात सुविधा पोहोचवून गावातच पशूधनावर उपचार करावेत, असे आवाहन आ़ विजय भांबळे यांनी केले़
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे संत जनार्धन महाराज यांच्या यात्रेनिमित्त ५ जानेवारी रोजी पशू प्रदर्शन भरविण्यात आले होते. याप्रसंगी आ़ विजय भांबळे बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनार्धन महाराज संस्थानचे अध्यक्ष रामप्रसाद शर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सभापती इंदूमतीताई भवाळे, राकाँचे ओबीसी पदाधिकारी नानासाहेब राऊत, सरपंच बी़जी़ चव्हाण, पशू संवर्धन उपायुक्त एम़ आऱ रत्नपारखी, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डी़टी़ वाघमारे, रामराव उबाळे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, बालासाहेब घुगे, शरद मस्के, बाळासाहेब घुगे, शरद मस्के, पुरुषोत्तम घुगे, पीक़े़ आकोसे, मधुकर भवाळे, बी़ आऱ देशमुख आदींची उपस्थिती होती़
आ़ भांबळे म्हणाले, पशूधनाची काळजी करीत शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालनही करावे, असे त्यांनी सांगितले़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकारी बीक़े़ जगाडे, एस़बी़ खाडे, डॉ़ साबने, बुचाले, सय्यद इम्रान, डॉ़ लाटकर, डॉ़ शाहीद देशमुख, बाबासाहेब म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले़ पी़ आऱ पाटील यांनी सूत्रसंचालन केले़
पशू प्रदर्शनास प्रतिसाद
चारठाणा येथील पशू प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय गटातून २५, एचएफ जर्शी गाय २०, नर, मादी वासरे २५, एचएफ जर्शी वासरे २०, लाल कंधारी वासरे गटातून ४० पशू दाखल झाले होते़ यामध्ये लालकंधारी गटातून भागवत लिपणे यांची गाय प्रथम आली़ तर महादेव वाडेकर, हरिश्चंद्र हेंद्रे यांच्या गायीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला़ एचएफ जर्शी गाय गटातून भारत तोडकर यांची गाय प्रथम, गोकूळ क्षीरसागर यांची गाय द्वितीय तर रघुनाथ ताठे यांची गाय तृतीय आली़ लाल कंधारी वासरे गटातून दिलीप आढे यांचे वासरू प्रथम, दत्ता क्षीरसागर यांचे वासरू द्वितीय तर बालासाहेब रासवे यांचे वासरू तृतीय आले़ लाल कंधारी वळू गटातून अच्युतराव चव्हाण यांचा वळू प्रथम, प्रदीप सरोदे यांचा वळू द्वितीय तर शेषराव सुपनर यांचा वाळू तृतीय आला़

Web Title: Animal exhibition at Charthana in Parbhani district: Provide health facilities to rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.