राष्ट्रीय छात्रसेनेचे वार्षिक शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:11 AM2021-02-19T04:11:17+5:302021-02-19T04:11:17+5:30
१८ फेब्रुवारी रोजी या शिबिराची सांगता झाली. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस.एन. केशेट्टी, सुभेदार जगतसिंग, सुभेदार जे.एस. बिस्ट, हवालदार ...
१८ फेब्रुवारी रोजी या शिबिराची सांगता झाली. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस.एन. केशेट्टी, सुभेदार जगतसिंग, सुभेदार जे.एस. बिस्ट, हवालदार सुनीलकुमार यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र बटालीयनकडून अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. ले. डॉ. प्रशांत सराफ यांनी सूत्रसंचालन केले. शिबीर यशस्वीतेसाठी ले. डॉ. जयकुमार देशमुख, संतोष कोकीळ, डॉ. जयंत बोबडे, प्रा. भंडारी, देवकर, येलेवाड, गरड, कृष्णा तोंडे, ज्ञानेश्वर खराटे, विष्णू राठोड, योगेश ठोंबरे, हर्षवर्धन जाधव आदी छात्रसैनिकांनी पुढाकार घेतला.
एनसीसीचे अनेक फायदे
जीवनात एनसीसी प्रशिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे.या प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये घडविण्यासाठी फायदा होतो. तसेच विद्यार्थी दशेमध्येच एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक शिस्त लागते. त्याचा फायदा जीवनात होतो. त्यामुळे एनसीसीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी यांनी केले.