अन्सार कॉलनीतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:18+5:302021-03-08T04:17:18+5:30
परभणी : शहरातील दर्गा परिसरातील अन्सार कॉलनीमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला होता. मनपाच्या पथकाने या कुत्र्यांचा बंदोबस्त केला आहे. ...
परभणी : शहरातील दर्गा परिसरातील अन्सार कॉलनीमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला होता. मनपाच्या पथकाने या कुत्र्यांचा बंदोबस्त केला आहे. दर्गा परिसरातील अन्सार कॉलनी आणि इतर वसाहतीत मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला होता. या कुत्र्यांनी काही जणांना चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोकाट कुत्र्यांचा त्रास लक्षात घेऊन येथील सलीम इनामदार यांनी ही बाब कोंडवाडा विभागप्रमुख विनय ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली. ५ मार्च रोजी कोंडवाडा विभागाच्या पथकाने अन्सार कॉलनी भागात येऊन सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला आहे. यावेळी सलीम इनामदार, शेख सद्दाम, बाबू टेलर, इरफान भाई, मनपाचे कर्मचारी सय्यद सरफराज, मोहन गायकवाड, आकाश जाधव, बाबा जाधव, नितीन जाधव, आनंद दीपकसिंग आदी उपस्थित होते.