मास्क वापरण्याचे नागरिकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:54+5:302021-02-23T04:25:54+5:30
अनेक शाळा विजेविनाच..! देवगावफाटा : सेलू तालुक्यातील. अनेक शाळांनी डिजिटल शाळांची संकल्पना अमलात आणली असली, तरी हे वर्ष कोरोनाच्या ...
अनेक शाळा विजेविनाच..!
देवगावफाटा : सेलू तालुक्यातील. अनेक शाळांनी डिजिटल शाळांची संकल्पना अमलात आणली असली, तरी हे वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विस्कळीत झाले आहे. परंतु, दुसरीकडे अनेक शाळांत डिजिटल साधने उपलब्ध असली, तरी वीजजोडणी मात्र नाही आणि काही ठिकाणी वीजबिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष लक्षात घेऊन सर्वच शाळांत वीजव्यवस्था करणे गरजेचे आहे.
दिशादर्शक फलकांना रंग द्या
देवगावफाटा : सेलू तालुक्यातील मुख्य व ग्रामीण रस्त्यावर लावलेल्या दिशादर्शक फलकांचा रंग नाहीसा झाल्याने हे दिशादर्शक फलक वाहनधारकांच्या मोठे गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने दिशादर्शक फलकांना रंग देऊन मार्ग दिसेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था..!
देवगावफाटा : सेलू तालुक्यातील रस्त्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली असून, हे प्रवासी निवारे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.